नाशिक । सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवणार्या लेकीवर माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या अंगणातच अंत्यसंस्कार करण्यात आले. पती,सासू व सासरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सासू सासर्यांना ताब्यात घेतले असून पती फरार झाला आहे. वाडीवर्हे येथील नंदिनी मालूंजकर (वय 23) वर्षीय विवाहितेने रविवारी आत्महत्या केली.
या घटनेनंतर मृत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसात धाव घेत सासरच्या मंडळींवर संशय घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी संशयितांवर वेळेत कारवाई केली नाही. त्यानंतर लेकीच्या मृत्यूचा संताप व्यक्त करण्यासाठी माहेरच्या मंडळींनी मुलीचा मृतदेह सासरी नेला. तिच्या घराच्या अंगणातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.