जळगाव : सासरच्या बंद घरातून जावयानेच ऐवज लांबवल्याच प्रकार जळगाव गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. तुषार विजय जाधव (पाटील, 25, रा.रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव) व त्याचा साथीदार सचिन कैलास चव्हाण (22, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.
जिल्हापेठ पोलिसात इाखल होता गुन्हा
जिल्हापेठ पोलिसांत सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता. या गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे खालील गोडावून चे कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेले असुन ती चोरी त्याचा जावई तुषार विजय जाधव (पाटील) याने केल्याचीा माहिती मिळाली होती.
यांनी आवळल्या मुसक्या
पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, प्रीतम पाटील, दीपक शिंदे, राहुल बैसाणे आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.