सासवड येथे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अधिवेशन

0

नगरदेवळा । महाराष्ट्र शाहीर परिषदेचे 11 वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 30 मे रोजी पुणे जिल्ह्यातील आचार्य केशव अणे यांच्या गावी अर्थात सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे हे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आजवर 10 अधिवेशन राज्याच्या विविध भागात संपन्न झाले. येत्या अधिवेशनात परिषदेचे ध्येय-धोरण, घटना, नियम आदी विषयांसह महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे विविध मागण्यांचे ठराव व कलावंत हिताच्या योजनांवर चर्चा होणार आहे.

परिषदेत तीन हजार सभासद
अधिवेशनात महत्वाच्या विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. शाहीर परिषदेचे विभागीय संघटन प्रमुख व जळगाव जिल्हा अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांनी केले आहे. राज्यात एकूण 23 जिल्ह्यात कार्यरत असलेली महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अडीच ते तिन हजार सभासद आहेत. या सर्व कलावंतांच्या भावी जीवनाच्या व लोककलेतील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले असून सभादांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाहीर शिवाजीराव पाटील, अध्यक्ष शाहीर दादा पसलकर (पुणे) यांनी केले आहे.