चिंचवड : शरीर संबंध ठेवण्यास पत्नी सक्षम नाही, असा आरोप करत मुलाला तिच्यापासून दूर करत घटस्फोट मागितला. तसेच महिलेकडे माहेरहून वेगवेगळ्या वस्तू आणण्याची मागणी करणार्या सासू आणि पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती योगेश दत्तात्रय मगर आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीर संबंध ठेवण्यासाठी फिर्यादी महिला सक्षम नाही असे म्हणत तिच्या सासूने घटस्फोट घेण्याची मागणी केली. तसेच पतीने माहेरून गाडी, चांदीची भांडी व लॅपटॉप घेऊन ये म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली. या मानसीक व शारीरीक छळाला कंटाळून पिडीतेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.