साहस फाऊंडेशन व मराठा शिक्षण संस्थेतर्फे धुलीवंदन उत्साहात

0

जळगाव। साहस फाऊंडेशन जळगाव व मराठा शिक्षण संस्था म्हणजे नुतनमराठा कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सप्तनारी शक्ती धुलीवंदनचा कार्यक्रम नुतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणात अती उत्साहात पार पडला. जळगाव शहरातील सुमारे 1500 मुली-महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहुन महानगरचे आमदार राजुमामा भोळे यांनी सुध्दा आपल्या कलागुणांना वाव देत महिलांसोबत आनंद साजरा केला.

मराठा संस्थेचे संचालक अ‍ॅड.विजय पाटील, प्रा.देशमुख, सुशील कलेक्शनचे मनोज वालेचा, मणियार बिरादरीचे फारुक शेख, शिवसेनेच्या शोभा चौधरी, मंगला बारी, मनसेच्या वैशाली विसपुते, राष्ट्रवादीच्या सविता बोरसे, भाजपाच्या जयश्री पाटील, दादाजी फाऊंडेशनच्या जयश्री भावसार, अंकुर प्रतिष्ठानच्या संगीता पाटील, नवीपेठ महिला मंडळाच्या राजी नायर, संध्या जहाँगिर, स्फुर्ती महिला मंडळाच्या वैशाली पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सर्व प्रथम साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरीता माळी यांनी कार्यक्रमामागची पार्श्‍वभुमी स्पष्ट करीत सर्व अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व कोरडा रंग लावुन स्वागत केले. डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे, नुतन कॉलेज, गर्व्हमेंट इंजिनिअरींग कॉलेज, जैन स्पार्टस्, अ‍ॅकेडमीच्या मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यात तरुणीसोबतच, गृहीणी व वयस्कर महिलांची उपस्थिती व सहभाग लक्षणीय होता.