साहा, पुजाराच्या खेळीने शेष भारत विजयी पथावर

0

मुंबई: खराब सुरुवातीनंतर वृद्धिमान साहा आणि कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या दमदार भागीदारीच्या बळावर शेष भारतने सामन्यात जोरदार वापसी केली आहे. चार खेळाडू ६३ धावांवर तंबूत परतल्यानंतर ३७९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या शेष भारतची अवस्था बिकट झाली होती. मात्र यानंतर आलेल्या वृद्धिमान साहा (123) आणि कर्णधार चेतेश्वर पुजारा (83) 203 धावांची जबरदस्त भागीदारी करत संघाला विजयाच्या पथावर आणून ठेवले आहे. पूर्णपणे बॅकफुटवर असलेला संघ या दोघांच्या जोरदार खेळीने अनपेक्षितरीत्या विजयाच्या मार्गावर आला आहे.

फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करुन गुजरातच्या दुसऱ्या डावावर नियंत्रण मिळवीत गुजरातला २४६ धावांवर गुंडाळले. पहिल्या डावातील १३२ धावांच्या आघाडीमुळे गुजरातने २७९ धावांचे लक्ष्य शेष भारत समोर ठेवले. पहिल्या डावातील दीडशतकवीर चिरागने या डावात ७० धावांची खेळी करून डावाला आकार दिला. शेष भारतकडून नदीमने शानदार गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. कौलने ३ तर मोहम्मद सिराजने २, पंकज सिंगने १ गडी बाद करत चांगली साथ दिली. रणजी जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात संघाला विजयाची संधी आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस गुजरातच्या आठ बाद २२७ धावा झाल्या होत्या. त्यात केवळ १९ धावांची भर घातली.

शेष भारतचा दुसरा डावही पहिल्या डावाप्रमाणे गडबडला. सलामीवीर अखिल हेद्वाडकर (२०) व अभिनव मुकुंद (१९) आपल्या खेळीला मोठा आकार देऊ शकले नाहीत. यानंतर करून नायर आणि मनोज तिवारी प्रत्येकी ७ धावांवर तंबूत परतल्याने शेष भारतची अवस्था अत्यंत बिकट झाली. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजाराने एकीकडून संयमी खेळी करत चिवट फलंदाजीचे दर्शन दिले. त्याच्यानंतर आलेल्या साहाने जबरदस्त खेळीचे प्रदर्शन करत शतक ठोकले. शेष भारत संघाला विषयासाठी 113 धावांची आवश्यकता असून उद्याचा एक दिवस शिल्लक आहे.

पार्थिव पटेलने पंचांना फटकारले
खराब पंचगिरीचा फटका बसल्यामुळे गुजरातचा संघनायक पार्थिव पटेल आपले नैराश्य लपवू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्यास आठ धावांच्या अंतरावर असताना पार्थिवला बाद दिले गेले. त्यामुळे तंबूत परतत असताना पंच वीरेंदर शर्मा यांच्यावर मैदानावरच त्याने तोफ डागली. ‘‘अगर करनी नहीं आती, तो अंपायरिंग करते क्यों हो?’’ अशा शब्दांत पार्थिवने शर्मा यांच्या पंचगिरीचा उद्धार केला. रविवारी गुजरातच्या दुसऱ्या डावातील ४८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही घटना घडली. शेष भारताचा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या पॅडला लागून उडालेला झेल अखिल हेरवाडकरने सुरेख टिपला. चेंडू बॅटला लागला की पॅडला याबद्दल शहानिशा न करता पार्थिवला बाद ठरवले.