साहित्याच्या माध्यमातून समस्यांचे प्रकटीकरण

0

भुसावळ। कथा साहित्यातील आदर्शवादी, यथार्थवादी साहित्यकार म्हणून प्रेमचंद यांची ओळख असून शेतकर्‍यांच्या समस्यांचे प्रकटीकरण साहित्याच्या माध्यमातून केले आहे. कृषक जीवनातील दयनिय घटनांचे यथार्थ भूमिवर चित्रण करुन जगाला श्रेष्ठ साहित्य दिले असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. गिरीष कोळी यांनी केले. येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयामध्ये हिंदी विभागामार्फत उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद यांची 137 वी जयंती साजरी करण्यात आली.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जाकीर शेख होते तर कार्यक्रमास प्रा.डॉ. गिरीष कोळी, प्रा. अरुणा ठाकुर, प्रा. लक्ष्मी तायडे आदी उपस्थित होते. प्रा. अरुणा ठाकुर यांनी प्रास्ताविक करतांना मुन्शी प्रेमचंद जयंतीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. जाकीर शेख म्हणाले की, उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद यांच्या आधीपासूनच उपन्यास लिहायला सुरुवात झाली होती पण समाजातील प्रश्‍नांना जनतेसमोर मांडणारे कथाशिल्पी म्हणजे मुन्शी प्रेमचंद होय. एवढेच नव्हे तर परदेशात सुध्दा मुन्शी प्रेमचंद यांच्या कथांचा अभ्यास केला जातो. उर्दु साहित्यातील प्रेमचंद यांचे स्थान सांगून त्यांच्या कथा व उपन्यास यांच्याविषयी माहिती दिली. विद्यार्थीनींनी मनोगतामध्ये अनय खान हिने मुन्शी प्रेमचंद यांच्या जीवनाच्या घटना सांगितल्या तर निलिमा कोळी या विद्यार्थीनीनेे प्रेमचंद यांच्या जीवनावरील प्रेरक प्रसंग सांगितले. लक्ष्मी कोळी हिने मुन्शी प्रेमचंद यांच्या कथाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. लक्ष्मी तायडे हिने तर आभार निलिमा कोळी हिने मानले.