भुसावळ । भविष्यकाळात मानवी अस्तित्वाच्या भविष्याचे विवेचन करीत असतांना नव्या वेगवान समाजासाठी अभिजात आणि दर्जेदार साहित्य निर्मिती होईल तसेच मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असलेला विज्ञान विचार साहित्याद्वारे समाजापर्यंत नेता येईल, असा प्रवाह अध्यापनामध्ये आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. शिरीष पाटील यांनी केले. येथील दे.ना. भोळे महाविद्यालयात उमवितर्फे पदव्युत्तर विभागाची एम.ए. मराठी भाग 1, 2 विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा घेण्यात आली.
उपेक्षित साहित्यिकांना न्याय देण्याच्या प्रयत्नाबाबत मुक्त चिंतन
उद्घाटन उमवि ललितकला विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. शिरीष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.पी. फालक उपस्थित होते. प्रा. पाटील यांनी अभ्यासक्रम निर्मितीची पार्श्वभुमी, नव्या अभ्यासक्रमाकडून असणार्या अपेक्षा, मर्यादा आणि व्याप्ती, गेल्या 50 वर्षातील देशभरातील विद्यापीठातील अभ्यासक्रमाची पार्श्वभुमी, भाषा शास्त्रासारख्या विषयातील क्लिष्टता, मुलभूत संशोधनाबाबतचा विचार, नाविण्य आणि उपेक्षित साहित्यिकांना न्याय देण्याच्या प्रयत्नाबाबत मुक्त चिंतन व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
प्राचार्य फालक यांनी मराठी भाषा विषयाच्या भविष्यकालीन विकास आणि वाटचालीसाठी भाषा संशोधन, विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळेल, दर्जेदार साहित्य निर्माण होवू शकेल, असे मत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. दयाघन राणे यांनी, प्रास्ताविक डॉ. एस.व्ही. बाविस्कर तर आभार डॉ. भारती बेंडाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. संंजय चौधरी, डॉ. जी.पी. वाघुळदे, प्रा.डॉ. आर.बी. ढाके, प्रा.डॉ. जगदिश चव्हाण, प्रा. अनिल सावळे, प्रा. रोहित तुरकेले, प्रा. श्रेया चौधरी, प्रा.डॉ. जयश्री सरोदे, प्रा. संंगिता धर्माधिकारी, प्रा. अनिल नेमाडे, प्रा. एस.डी. चौधरी, रणजित राजपूत, निलेश तायडे यांनी परिश्रम घेतले.