साहित्यामुळे मानवी जीवनात आशावाद निर्माण होण्यास मदत

0

पिंपळनेर । साहित्यामुळे मानवी जीवनात आशावाद निर्माण होण्यास मदत होवून मानवी मनात सकारात्मकवृत्ती निर्माण करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी साहित्याचे वाचन करून मन समृद्धशाली बनवायला हवे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक खैरनार यांनी उदघाट्नप्रसंगी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी रावसाहेब कुवर , प्रा. सौ. बी. एम. शेख, प्रा. डॉ. सतीश मस्के, प्रा. सी.एन.घरटे, प्रा. डॉ. ए.जी.खरात , प्रा. एल. जे. गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे हे होते. कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयात वाङमय मंडळ उदघाट्नप्रसंगी बोलताना डॉ. अशोक खैरनार बोतल होते. डॉ. खैरनार यांनी साहित्य माणसाला सृजनशील बनवत असतं म्हणून साहित्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी प्रतिभावंत व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी साहित्याचा अभ्यास करावा
यावेळी कवी रावसाहेब कुवर यांनी विद्यार्थ्यांना कविता कशी निर्माण होते हे सांगून खेड्यातील पोरं बसली आहेत येड्यासारखी, बुध्द होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो कवी व बाप अशा कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीयस्थानावरून प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी केले. प्रास्तविक प्रा. डॉ. ए. जी. खरात यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एल. जे. गवळी व प्रा. सी. एन. घरटे यांनी करून दिला. आभार प्रा. सी. एन. घरटे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. एस. एन. तोरवणे, प्रा. जे. पी. अमृतकर प्रा. एम. व्ही. बळसाणे, प्रा. डी. डी. नेरकर, प्रा. के. आर. राऊत, प्रा. डी. बी. जाधव, डॉ. शिरसाठ, डॉ. मोरे, प्रा. सावळे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.