साहित्य प्रदर्शनातील विजेत्यांना आळंदीत बक्षिस वाटप

0

ज्ञानेश्‍वर विद्यामंदीर व ज्ञानेश्‍वर विद्यालय यांचा उपक्रम

आळंदी : ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यामंदिर, श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय, ज्यु.कॉलेज यांनी संयुक्तरित्या नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्य-पुस्तक वाटप, कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षिस वाटप तसेच सन 2017-2018 या शैक्षणिक वर्षात 100 टक्के उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.शरद महाराज बंड होते. याप्रसंगी नंदिता सबनीस, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्‍वस्त प्रकाश काळे, पर्यवेक्षक दीपक मुंगसे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत
प्रशालेत 1 ली ते 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सन 17-18 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कला कार्यानुभव साहित्य प्रदर्शन उपक्रमातील विजेत्यांना विश्‍वस्त प्रकाश काळे यांनी रोख रकमेच्या स्वरुपात सन्मानित केले. तसेच या वर्षात शंभर टक्के उपस्थित एकवीस विद्यार्थ्यांना रंगीत पेन्सील भेट देण्यात आला. 2014-15 पासून सन 2017-18 या चारही वर्षात शंभर टक्के उपस्थिती राहिलेल्या क्षितिजा दरेकर व चेतन घुंडरे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत शाल, श्रीफळ व ज्ञानेश्‍वर माउलींची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. पुढील सलग चार वर्षे उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी नवीन कपडे बक्षिस स्वरूपात देण्याचा निर्णय विश्‍वस्त प्रकाश काळे यांनी जाहीर केला.
यावेळी नंदिता सबनीस, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्‍वस्त प्रकाश काळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रदिप काळे यांनी केले. सोपान वायळ यांनी सुत्रसंचलन केले. आभार वर्षा काळे यांनी मानले.