साहित्य संमेलनाध्यक्षपदी वसंत डहाके

0

जळगाव । शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या चौदाव्या वर्धापन दिना निमित्त होणार्‍या एक दिवसीय राज्यस्तरीय तेराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी तथा लेखक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. 2017-2018 हे वर्ष बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची स्मृती शताब्दी वर्ष असल्याने या वर्षीचे सूर्योदय साहित्य संमेलन कविता या वाड्मय प्रकारास वाहिलेले असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

दरम्यान आजवर प्रा. डॉ. दत्ता भोसले, प्रा.डॉ. तारा भवाळकर, डॉ. बोल्ली लक्ष्मीनारायण, वामन होवाळ, प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, डॉ. रा. र. बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा. डॉ. यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीत बर्वे, या मान्यवर लेखकांनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवलेली आहे. संमेलनात कविता वाचन करू इच्छिणार्‍या कवींनी आपल्या कवीता पाठवावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. कविता सादरी करणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. साहित्य संमेलनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.