दिशा फाऊंडेशनतर्फे आयोजन
चिंचवड : दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे मंगळवारी (दि.23) सायंकाळी 5 वाजता अॅटो क्लस्टर सभागृहात (चिंचवड) बडोदे येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधिक सत्कार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे हे संमेलनाध्यक्षांची मुलाखत घेणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार मा.उल्हासदादा पवार, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहील,अशी माहिती समन्वयक नाना शिवले यांनी दिली.