शिंदखेडा । साहुर-जुने कोर्दे शिव रस्त्यांवर शेतकरी व गावकरींसाठी मदारी नाल्यावर लहान पुल मंजूर करावा यासाठी शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गावकर्यांनी अनेक आंदोलन केलीत. त्यात जलसमाधी,रास्ता रोको,आमरण उपोषण,स्वःइच्छा मरण आदी आंदोलनाचा समावेश आहे. तरी ही सरकारने दखल घेतली नाही. या नाल्यात सारंगखेडा बॅरेज तापी नदीच्या बॅकवॉटरमुळे साहुर ते बाम्हणे व जुनेकोर्दे ते नवेकोर्दे रस्ता बंद झाला आहे.
नाल्याचे घेतले मोजमाप
अनेक शेतकरी 7 ते 8 कि.मि.चा फेरा वाचावा म्हणून मदारी नाला पोहत जाऊन शेती व्यवसाय करतात. अशातच साहुर येथील तरूण शेतकरी रावसाहेब आनंदा चित्ते यांचा मदारी नाल्यात 2010 साली बुडून मृत्यू झाला होता. म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांच्या पाठपुरावाने दोंडाईचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यु. आर. वाघ, शाखाअभियंता के. बी. पवार, एस. एस. गोसावी यांनी आज मदारी नाल्यावर जाऊन पाहणी करून नाल्याचे मोज माप घेतले. त्यांच्या सोबत शानाभाऊ सोनवणे उपस्थित होते. या पुलाचे अंदाजपत्रक पुढिल कार्यवाहीसाठी लवकरात लवकर पाठवुन देतो असे आश्वासन वाघ या वेळी शेतकर्यांना दिले.