साहूर येथे रात्रभर पाण्यात उभे राहू आंदोलन

0

शिंदखेडा। राज्यात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. यानुसार धुळे जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. यानुसार शेतकरी व शिवसेना पदाधिकारींनी 7 जून सकाळी 11 वाजे पासून साहुर ता . शिंदखेडा येथे अखंडित रात्रभर पाण्यात उभे राहुन जल आंदोलन सुरू केले आहे. असे असतांना या आंदोलकांची एकही प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांनी दखल न घेतल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.

नायब तहसीलदारांना पाठविले माघारी
आंदोलनाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नाही. बंदोबस्तासाठी केवळ 2 पोलीस उपस्थित आहेत. बुधवारी दुपारी नायबतहसीलदार यांनी भेट दिली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असताना आंदोलकांनी त्याना सांगितले की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तो पर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. यानंतर नायबतहसीलदार हे निघून गेले. आंदोलकांनी रात्रभर पाण्यात उभे राहुन जल आंदोलन सुरुच ठेवले. आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे,राजू रगडे ,किरण साळवे, मयूर निकम,गंगाराम शिरसाठ, राकेश राजपूत, गणेश भदाणे, कैलास ठाकूर, राकेश सोनवणे, रमेश कोळी,योगेश सोनवणे, शानाभाऊ शिरसाठ, बाळू कोळी, कैलास कोळी यांनी सहभाग घेतला होता.