नवी दिल्ली-भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कारकिर्दीत स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. फलंदाजीच्या विशेष शैलीमुळे त्याने आपल्या नावावर अनेक मोठमोठे विक्रम केले. इतकेच नव्हे तर निवृत्तीनंतर आता सेहवाग त्याच्या ट्विटरवरील फलंदाजीसाठी कायम चर्चेत असतो. त्याचे ट्विट्स कायम युझर्सच्या पसंतीस उतरतात.
July 7th- MS Dhoni
July 8th- Sourav Ganguly
July 9th- ?
July 10th- Sunil Gavaskar
The missing 9th. Somewhere, a future India captain and icon will be born or celebrating his birthday today.#JulyMePaidaHoJaaoCaptainBanJaao— Virender Sehwag (@virendersehwag) July 9, 2018
अशाच प्रकारचे ट्विट आज पुन्हा एकदा सेहवागने केले आहे. भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराबाबत एक ट्विट त्याने केले आहे. भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सेहवागने भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराची जन्मतारीख काय असेल? हे सांगितले आहे.
७ जुलै हा धोनीचा जन्मदिवस आहे. ८ जुलै हा सौरव गांगुलीचा जन्मदिवस आहे. तर १० जुलै हा सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस आहे. आता ९ तारीख फक्त रिकामी आहे. याचा अर्थ भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार हा अजून जन्माला यायचा आहे किंवा कुठेतरी आपला वाढदिवस साजरा करत आहे. याबरोबरच ‘जुलै महिन्यात जन्माला या आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बना’, असा हॅशटॅग वापरत त्याने आपल्या खास शैलीचा पुन्हा एकदा अनुभव दिला.