सा.बां.विभागाचा कनिष्ठ लिपिक जाळ्यात
अडीच हजारांची लाच मागणी भोवली : जळगाव एसीबीने लाच मागणीचा गुन्हा दाखल करून आवळल्या मुसक्या
रावेर : सेवानिवृत्त कर्मचार्याच्या ग्रॅज्युएटीची व अर्जित रजेची येणारी रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात अडीच हजारांची लाच मागणार्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी अटक केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. शेख वसीम शेख फयाज (30, रा.मदिना कॉलनी, रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला ट्रॅपबाबत संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी सिद्ध झाल्याने गुरूवारी त्यास अटक करण्यात आली.
सा.बां.विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्याकडेच मागितली लाच
रावेर तालुक्यातील 24 वर्षीय तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना मिळणार्या तीन हजार 91 हजार 710 रुपये ग्रॅज्युवटीची रक्कम तसेच अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी एकूण अडीच हजार लाच आरोपी शेख वसीम यांनी 11 जुलै रोजी मागितली होती मात्र तक्रारदाराला ट्रॅपचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणी सिद्ध झाल्याने गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली आरोपीला अटक
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक लोधी, एएसआय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींनी ही कारवाई केली.