सिंगल ब्रँड रिटेल, बांधकाम क्षेत्रात 100 टक्के एफडीआय

0

परकिय गुंतवणूक वाढीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक क्षेत्रात एफडीआयच्या धोरणात महत्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सिंगल ब्रँड रिटेल ट्रेडिंग तसेच बांधकाम क्षेत्रातही 100 टक्के एफडीआयची घोषणा करण्यात आली. ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने परकीय गुंतवणूक धोरणांतील सूट त्याचबरोबर एअर इंडियातील गुंतवणूकीत परदेशी कंपन्यांना 49 टक्के हिस्सा देण्यासही सूट दिली आहे. त्यामुळे आता परदेशी विमान कंपन्या एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे.

एअर इंडियात 49 टक्के गुंतवणुकीला मंजुरी
केंद्र सरकारने परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांर्गत पॉवर एक्सचेंजमध्ये देखील गुंतवणूकीसाठी मंजूरी दिली आहे. या क्षेत्रात एफडीआयला परवानगी दिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगारामध्ये चांगली वाढ पहायला मिळू शकते. नुकतेच केंद्र सरकारने आपल्या एफडीआय धोरणांमध्ये सुधारणा करीत संरक्षण, बांधकाम विकास, वीमा, पेंशन आणि इतर वित्तीय सेवांसहित प्रसारण, नागरी हावाई वाहतुक आणि फार्मा क्षेत्रात गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे देशात एफडीआयच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते.