Mobile theft attempt in Sindhi Colony in Bhusawal : Crime against one भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील व्यापारी झोपले असताना संशयीताने खिडकीतून हात घालून मोबाईल लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी जाग आल्याने आरोपीच्या हातातून मोबाईल निसटला व त्याने पळ काढल्याची घटना बुधवार, 7 रोजी रात्री 3.27 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत धीरज वसंत खंडारे (22, अशोक नगर, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
व्यापारी अशोक कोडामल बठेजा (40, खोली क्रमांक 16, सिंधी कॉलनी, भुसावळ) हे 7 रोजी रात्री झोपले असता आरोपी धीरज खंडारे याने खिडकीतून हात घालून सॅमसंग कंपनीचा तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला मात्र तो खिडकीतून खाली पडल्याने व्यापार्यास जाग आल्याने आरोपीने पळ काढला. या प्रकरणी बठेजा यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक अन्वर शेख करीत आहेत.