सिंधी कॉलनीत वृध्दाचा मृतदेह आढळला

0

जळगाव। सिंधी कॉलनीतील रिक्षा स्टॉपजवळ एका 60 ते 65 वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, वृध्दाची संपूर्ण ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी रिक्षास्टॉपजवळील एका झाडाखाली वृध्दाचा मयत स्थितीत मृतदेह आढळुन आला.

पोलिसांनी विचारपूरस केल्यानंतर वृध्दाला बापु म्हणून सर्व ओळख असल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. मात्र, वृध्दाचे संपूर्ण नाव व नातेवाईकांबाबत काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर राजू नथ्थु पटेल यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर पुढील तपास दिलीप सोनार हे करीत आहेत. यातच वृध्दाच्या नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.