नंदुरबार । उसनवारी पैशांच्या वादातून सिंधी व्यापार्यांमधील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली. याबाबत परस्परांविरुद्ध फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गटातील 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश राजेश सिंधी हा त्याचा मित्र राजू किंगर सोबत येतो, या कारणावरून जयेश यास दगड, स्टंपने जबर मारहाण करण्यात आली. यात तो जखमी झाला. ही घटना धनश्री आईस्क्रीमच्या मागे घडली असून जयेश सिंधी याने उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेठानंद दादलानी, भोला शेठ दादलानी, केशू दादलानी, टेपु दादलानी यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी लालचंद तेजुमल दादलानी यांनी फिर्याद दिली आहे. उसनवारी पैशाचा वादातून जयेश राजेश सिंधी याने दगडाने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे, त्या नुसार जयेश यांच्याविरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.