जळगाव । भारतीय सिंधी सभेची राष्ट्रीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत समाजातील भावी पीढीला समाजाबाबतचा इतिहास, संस्कृती व मातृभाषा याबाबत जनजागृती व्हावी यासाठी 8 व 9 जुलै रोजी या दोन दिवशीय सभेचे आयोजन शहरातील जैन व्हॅली, गांधी तीर्थ शिरसोली रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत देशभरातील जवळपास 150 प्रतिनिधींसह राज्यातील सिंधी समाजातील विद्यामान 9 आमदार कार्यक्रमास उपस्थिती राहणार असून यावेळी कार्यकारिणी जाहिर होणार आहे.
विविध विषयांवर झाली चर्चा
गेल्या काही कालखंडात सिंधु समाजातील नागरीक भारतात कसे आले. त्यांच्या कोणता व्यवसाय निवडला याबाबत पत्रकार परीषदेत मान्यवरांनी चर्चा केली. आज समाजातील बांधव विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत असून भारताचे नाव उचावत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी भारतीय सिन्धु सभा राष्ट्रीय प्रतिनिधी सभेबद्दल माहिती भारतीय सिंधु सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदास चंदिरामानी मुंबई यांनी करून दिली. सोबत भारतीय सिन्धु सभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष लधाराम नागराणी मुंबई, भारतीय सिन्धु सभेचे महामंत्री राधाकृष्ण भागीया मुंबई, भारतीय सिन्धु सभेचे महामंत्री भगतरामजी छाबडा कोल्हापूर, भारतीय सिन्धु सभेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष सीए महेश तेजवाणी, भारतीय सिन्धु सभाचे महाराष्ट्र प्रांत महामंत्री संजय हिराणी व भारतीय सिन्धु सभा जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. एम.पी. उदाशी व सचिव प्रेम कटारिया यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.