सिंधी समाजातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

0
जळगाव– कंवर नगर सिंधी पूज्य पंचायत उबावडो-बहावलपुर संस्थेतर्फे रविवारी सिंधी समाजातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ हा कार्यक्रम सिंधी कॉलनी परिसरातील बाबा हरदासराम समाज मंदिरातील सभागृहात पार पडला़
गुणगौरव सोहळ्याच्या अध्यस्थानी अशोक मंधान हे होती़ व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, माजी आमदार गुरूमुख जगवानी, डॉ़ संजय शेखावत, मनिष अवस्थी, पंकज दारा, शंकर तलरेजा, सतीश मतानी, नरेश कावना, रामलाल कुकरेजा, राजु अडवानी आदी उपस्थित होते़ अशोक मंधान यांनी अध्यक्षीय भाषण केले़ त्यानंतर एस़एस़बी़टी महाविद्यालयाचे डॉ़ संजय शेखावत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करीअर संबंधी मार्गदर्शन करत काही टीप्स् दिल्या़
विद्यार्थ्यांचा सत्कार
सिंधी समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदविका, इंजिनिअर, डॉक्टर, सीए अशा १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला़ यावेळी काही विद्यार्थीनी आपली मनोगत सुध्दा व्यक्त केली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद मिसरानी व शंकर तलरेजा यांनी केले़ .