सिंधूची अंतिम फेरीत दाखल

0

जकार्ता – पी.व्ही सिंधूने आशियाई स्पर्धेत बॅडमिंटन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये विजय मिळवला आहे. यामुळे भारताचे एक रौप्य पदक निश्चीत झाले आहे.

उपांत्य फेरीतील सायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या नजरा पी.व्ही सिंधूवर होत्या. सिंधूने उपांत्य फेरीच्या लढतीत दमदार कामगिरी करत आशियाई स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली. सिंधूने जपानच्या यामागुचीचा पराभव केला.

जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या अकाने यामागुचीने सिंधूला विजयासाठी लांगलेच झुंजवले. सिंधूने २१-१७, १५-२१,२१-१० अशा फरकाने हा विजय मिळवला. पहिला गेम सिंधूने जिंकला, मात्र, यानंतर दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने कामगिरी उंचावत दुसरा गेम खिशात घातला. दुसरा गेम गमावल्याचा सिंधूवर काहीही परिणाम झाला नाही. तिने तिसऱ्या गेममध्ये अधिक आक्रमक खेळ करत यामागुचीवर दडपण टाकले आणि विजय मिळवला.