सिंधूची अंतिम फेरीत धडक

0

सोल : पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, तिने चीनच्या बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला. पहिल्या गेमची दमदार सुरूवात करत सिंधूने 9-1 अशी बढत घेतली. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंगजियाओवर 21-10 असा विजय मिळवला. पण दुसर्‍या गेममध्ये बिंगजियाओने सिंधूला जोरदार टक्कर दिली. त्यामुळे सिंधूने दुसरा गेम 17-21ने गमावला. मात्र, तिसर्‍या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधूने बिंगजियाओवर 21-16 अशी मात करत सामनाही जिंकला. अंतिम सामन्यात सिंधू जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध भिडणार आहे.