सिंधूला कोरियन सीरिजचे विजेतेपद

0

सेऊल । भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने कोरियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. रविवारी झालेल्या सामन्यात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 असा पराभव केला. कोरिया ओपन सूपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूने अतिशय अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये 22-20 इतक्या कमी फरकाने जिंकला.