सिंधूला विश्रांती

0

नवी दिल्ली । थायलंड ओपन स्पर्धेसाठी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी थायलंड, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारत पूर्ण ताकदीचा संघ पाठवणार आहे. थायलंड ओपन 30 मे, इंडोनेशिया ओपन 12 जून आणि ऑस्ट्रेलिया ओपन 20 जूनपासून सुरू होणार आहे. या तीनही स्पर्धांसाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली. पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानी असलेल्या बी. साईप्रणित याच्यावर भारताच्या प्रामुख्याने आशा असतील.