सिंधू उपांत्य फेरीत, सेमी फायनलमध्ये सायना

0

ग्लासगा । ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. तिने चीनची खेळाडू सुआन यूवर 21-14, 21-9 अशी मात केली. मात्र, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळविण्याचे किदम्बी श्रीकांतचे स्वप्न शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू सोन वानहोने त्याला 21-14, 21-18 असे हरवले. तर दुसरीकडे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हीने आपले उत्तम खेळाचे प्रदर्शन करत स्कॉटलॅण्डची क्रिस्टी गिलमौर हीचा 21-19, 18-21, 21-15 असा पराभव करत उत्पांत्य फेरीत विजय मिळवला, आता तिचा सेमी फाईनलमध्ये नोजिमि ओकुहारा हिच्यासोबत आहे.

सिंधूने सुआनविरुद्धच्या लढतीत सुरुवातीपासून नियंत्रण मिळविले होते. तिने खोलवर परतीचे फटके मारले. तसेच तिने बॅकहॅण्ड फटक्यांचाही सफाईदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये सुआनने तिला थोडीफार झुंज दिली. तथापि, सिंधूने जागतिक स्पर्धेतील अनुभवाचा फायदा घेत हा गेम घेतला. दुसर्‍या गेममध्ये सिंधूने स्मॅशिंगच्या आक्रमक फटक्यांचा उपयोग करीत 8-2 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. तिने 11-4 अशी आघाडी वाढविली. त्यानंतर सुआनने रॅलीज करीत रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिंधूच्या वेगवान खेळापुढे तिच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. हा गेम घेत सिंधूने 39व्या मिनिटांत सामना जिंकला. सिंधूने दोन वेळा या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.

पुरूष गटातील श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
श्रीकांतने यंदाच्या मोसमात इंडोनेशिया व ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या दोन्ही स्पर्धामध्ये त्याने दक्षिण कोरियाच्या सोन वानहोला पराभूत केले होते. त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते.या पार्श्‍वभूमीवर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सोन याने आक्रमक खेळ करीत त्याला सरळ गेम्समध्ये नमविले. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने केलेल्या चुकांचा फायदा घेत सोनने 6-1 अशी आघाडी