सिंधू ,सायनाची विजयी सलामी

0

सिडनी । भारताच्या स्टार बॅटमिटनपटू पी.व्ही.सिधू व सायना नेहवाल यांनी आप आपल्या सामन्यात विजयाने सुरवात केली आहे. इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद पटकावणार्‍या जपानच्या सायका साटोचा सिंधूने 21-17,14-21,21-18 असा पराभव करून धक्का दिला. साटोने अनके वेळा सिधूला पराभव केला आहे. मात्र हा सगळा इतिहास मागे टाकत सिंधूने पहिल्याच सेटमध्ये साटोला धक्का दिला. तर दुसर्‍याकडे गतविजेता सायना नेहवालने आपली सुरवता विजयाने केली आहे. सायनाने दक्षिण कोरियाच्या स्योंग जी ह्यून हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. गतविजेच्या सायना नेहवाल समोर असणारी प्रतिस्पर्धी तितकीच तुल्यबळ असल्यामुळे हा सामना अटीतटीचा होईल अशी आशा व्यक्त केली जात होती.

सिंधूने अनुभव पणाला लावून विजय
ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या सुरुवातीला बरोबरीत सुरु असलेल्या सेटमध्ये सिंधूने साटोवर 2 गुणांची आघाडी घेतली. मात्र घेतलेली आघाडी काही चुकामुळे काही गुणांनी कमी झाली.आपल्या चुका सुधारित पहिला सेट सिंधूने आपल्या नावावर केला.दुसर्‍या सेटमध्ये सिधू -साटो याच्यात अटीतटीचा सामना झाला. बरोबरीत असतांना सिधूने आपल्या आक्रमक शैलीचा वापर करित आघाडी मात्र दुसरी सेटमध्ये आघाडी घेतली. मात्र साटाने आपला अनुुभव पणाला लावून हा सेट आपल्या नावावर केला.आणि सिधू व साटोमध्ये बरोबरी झाली.झालेल्या चुका लक्षात ठेवून सिंधूने तिसर्‍या सेटमध्ये साटोला वरचढ होवू दिले नाही. तिच्या प्रत्येक फटक्याला त्याच पध्दतीने सिधूने उत्तर दिले. 11-9 अशी आघाडीनंतर साटोने पुन्हा बरोबरी करित आपण इतक्या लवकर हार मानणार नाही हे दाखविले. सिंधूकडे 6 मॅच पॉईंट होते. मात्र सायका साटोने यापैकी 4 पॉईंट वाचवत सामना आणखीन उत्कंठावर्धक केला. पण अखेर सिंधूने अनुभव पणाला लावत विजय संपादन केला.

सायनाने सहज सामना जिंकला
सायनाने हा सामना अगदी सहज जिकला. पहिल्या सेटपासून सायनाकडे आघाडी होती. ती आघाडी तीने अखेरपर्यंत कायम ठेवली. पहिल्या सेटमध्ये स्योंगने सायनला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र सायनने तो परतावून लावला. सायनाकडे 20-9 पहिला सेट जिकला.दुसर्‍या सेटच्या प्रारंभी स्योंगने आक्रमक खेळ करित 2 गुण मिळविले.सायनाने स्योंगला तिच्याच भाषेत उत्तर देत सेट बरोबरीत केला. आणि यानंतर सायनाने स्योंगला परत डोके वर काढायची संधीच दिली नाही. सलग 4 पॉईंट मिळवत सायनाने पहिला सामनाही जिंकला. नुकत्याच पार पडलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत सायनाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे गतविजेती सायना या स्पर्धेत कशी कामगिरी करतेय याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.