मुंबई – रणवीर सिंगचा आगामी ‘सिंबा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग सुरू असून रणवीर सेटवर खूपच मजा मस्ती करताना दिसत आहे. यादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणवीर सिंगने नि सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिग्दर्शक करण जोहरला बळजबरीने किस करत आहे. सेटवर घडलेला हा किस्सा चित्रपटाच्या टीमने त्याचक्षणी कॅमेऱ्यात कैद केला.रणवीरने फोटोला कॅप्शन देत लिहिले, ‘आमच्या येथे प्रेमच प्रेम मिळेल. सेटवरची एक झलक’.