पुणे । सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठातर्फे जागतिक युवा कौशल्य दिन किवळे येथील प्रांगणात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांनी 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. या दिनाचे औचित्य साधून सिंम्बीस्किल्स या कार्यक्रमाची सुरुवात केली.
सिंम्बीस्किल्सच्या माध्यमातून राज्य स्तरावरील युवा पिढीची सांगड घालू शकतो. या अंतर्गत विद्यार्थ्याची उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी ओळख, नवनवीन तंत्र व तंत्रज्ञानाकडे असलेला कल तसेच उच्चतम क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याची ओळख करून देऊ शकतो, असे संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले. जर्मनी व उद्योग क्षेत्रांच्या सहाय्याने कार्यशाळेचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगपती विशाल चौरडिया, खेळाडू धनराज पिल्ले, अभिनेत्री दिप्ती श्रीकांत, शेफ पराग कान्हेरे, आर. जे. संग्राम, आर. जे. केदार आदी उपस्थित होते.