कारवाईची मागणी करत हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
पुणे । सिंहगडावर कंत्रटदाराने १ कोटी ३९ लाख रुपयांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून भ्रष्टाचार केला आहे. या संर्दभातील अहवाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने जिल्हाधिकार्यांना सादर करून देखील त्यावर संबंधितांकडून खुलासा मागवण्याच्या पलीकडे शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. यात दोषी असलेल्या कंत्राटदारावर फौजदारीचे गुन्हे दाखल करावते अन्यथा शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय हिंदू आंदोलनचे समन्वयक पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुनील चिंचोलकर, मोहनराव डोंगरे, सागर मते, नितीन महाजन आदी आदी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात मोठा घोटाळा झाला असून भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्रटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावी. तसेच किल्ल्याचे बांधकाम प्रामाणिक आणि तज्ज्ञ कंत्राटदारांकडून तातडीने करून घेण्यात यावे. अशा मागण्या असून शासनाने या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्यात यईल.