सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोणावळा : येथील सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या तिसर्‍या वर्षात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने कॉलेज कॅम्पस मधील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक अरुण वर्पे (वय 20, मूळ रहाणार वारुळवाडी, नारायणगाव ता. जुन्नर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याप्रकरणी लौकीक राजेंद्र लौंध (वय 20, सध्या राहणार सिंहगड कालेज, मूळ राहणार कोसुंब, जिल्हा रत्नागिरी) याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सोमवारी (दि.26) सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी प्रतीक याने तो रहात असलेल्या राजगड वसतिगृहातील खोली नं. 35 मध्ये अज्ञात कारणाने खोली मधील पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीसचे पो.नि. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. अजित ननावरे हे करीत आहेत.