सिंहगड घाट रस्ता चार दिवस बंद

0

पुणे-‘सिंहगड घाट रस्त्यावर अद्यापही किरकोळ दरड पडण्याचे सत्र सुरू असल्याने हा घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव घाट रस्त्याने गडावर जाण्याचे नियोजन करू नये,’ असे आ‌वाहन वन विभागाने केले आहे. पर्यटकांना पायवाटेने गडावर जाता येणार आहे.

संततधार पावसामुळे गेल्या आठवड्यात रविवारी पहाटे सिंहगड घाटात दरड पडली होती. मोठ्या दगडांनी रस्ता व्यापला असल्यामुळे वन विभागाने आठवडाभर घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवला होता. वन कर्मचारी आणि घेरा सिंहगडच्या कार्यकर्त्यांनी घाट रस्ता आता रिकामा केला आहे. मात्र, संततधार पावसामुळे दररोज लहान-मोठे दगड डोंगरावरून खाली येत आहेत. त्यामुळे पर्यटकांना अद्याप गडावर जाण्यासाठी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. वन विभागाने गडावर जाणारे गोळेवाडी आणि कोंढणपूर येथील मार्ग पर्यटकांसाठी बंद केले. सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड पडण्याचे सत्र गेल्या चार वर्षांपासून सुरू आहेत. गेल्या वर्षी देखील पावसाळ्यातील दोन महिने सिंहगड दरडीमुळे बंद राहिला होता.