सिंहगड नवले कॉलेजला नॅकची ‘ब’ श्रेणी

0

लोणावळा : लोणावळा येथील सिंहगड एज्युकेशन ट्रस्टच्या एन.बी.नवले कॉलेजला नॅक समितीने नुकतीच भेट दिली. या भेटीत समितीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थी केंद्रित तसेच सर्व लाभार्थींसाठी केलेल्या समग्र कार्यांची निरीक्षणे केली. बंगळुरूच्या राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन संस्थेमार्फत (नॅक) प्रत्येक पाच वर्षामधून एकदा तपासणी केली जाते. सिंहगडच्या एन. बी.नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गुणवत्ता तपासणीसाठी अशा प्रकारची त्रिसदस्य समिती नॅकने नियुक्त केली होती. त्यामध्ये सयाजीराव विश्‍वविद्यालय बडोदा गुजरातचे कुलगुरू प्रा. डॉ. परिमल व्यास (अध्यक्ष), डॉ. पीटर डेविड, कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विश्‍वविद्यालय कोचीन केरळचे कुलसचिव प्राचार्य डॉ. मस्थानैया (सदस्य), डी.के.शासकीय महिला महाविद्यालय नेल्लोर आंध्र प्रदेश यांचा समावेश होता.