सिकलसेल दिनानिमित्त जनजागृती रॅली

0

धुळे । जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सोमवारी 19 रोजी धुळे शहरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिकलसेल आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणुन पोस्टरद्वारे संदेश देण्यात आले. यासाठी रॅलीत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात 41 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 8 ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहे याठिकाणी सिकलसेल आजाराची मोफत तपासणी व चाचणी करण्यात येते. ग्रामीण रुग्णालय साक्री, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे देखील सिकलसेलची मोफत तपासणी चाचणी करण्यात येते. या उपक्रमांतर्गत शहरात रॅली काढण्यात आली.