चोपडा : सिगारेट न पाजल्याच्या कारणावरून एका तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिगारेट न पाजल्याने मारहाण
शहरातील पंकज स्टॉपजवळ अमोल माळी याच्या पानटपरीजवळ मनिष संजय पाटील (18, बोरोले नगर) हा उभा होता. त्यावेळी यश सुनील मकवाना, शुभम महेंद्र पाटील, तानाजी उर्फ गौरव किशोर पाटील (सर्व रा.अरुण नगर, चोपडा) हे तिथे आले. त्यावेळी यश मकवाना याने मनिषला सांगितले की, तु आज मला सिगरेट पाज, असे सांगितले. त्यावर मनिषने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी मनिषला चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने मनिषच्या डोक्यात दगड मारला. जखमीवस्थेत मनिषला तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस नाईक शेषराव तोरे करीत आहे.