मुंबई: बहुचर्चित सिंचन घोटाळ्यावरून आघाडी सरकारवर मोठी टीका झाली. २०१४ मध्ये आघाडी सरकार जाण्यामागे सिंचन घोटाळ्याचा विषय होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा मुख्य संशय आहे. सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केला त्यात अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आले आहे. घोटाळ्याचा सर्व ठपका अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान सिंचन घोटाळयाप्रकरणी आजी-माजी दहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम केल्याचे आरोप करण्यात आले आहे.