सिटीस्कॅन मशिन येणार

0

जळगाव । जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून रुग्णाच्या अतिमहत्वाचा जीवनावश्क भाग बनलेल्या सिटीस्कॅन मशिन बाबत अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांची सिटीस्कॅन मशिन जिल्हारुग्णालयात सुरु व्हावे यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे मागणी होती. अखेर उशिरा का होईना जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन विभागाची स्थापना होत असल्याने नागरिकान मध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे. सिटीस्कॅन मशिन जिल्हारुग्णालयात नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. सामाजिक संघटना आणि लोकप्रतीनिधिनी यासाठी आंदोलने केली. गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षा नंतर लढ्याला यश आले आहे.

सिटीस्कॅनची व्यवस्था नसलेल्या जिल्हा रुग्णालयाला मिळालेले सिटीस्कॅन मशिन जून महिन्यात नागरिकांच्या सोयीसाठी दाखल होणार असून खाजगी रुग्णालयात होणारी पीडवणूक यामुळे थांबणार आहे. सिटीस्कॅन मशीन असलेल्या विभागाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. 5 जून पर्यत सिटीस्कॅन मशिन सुरु करण्यात येईल असा अंदाज रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यानी वर्तविला आहे गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सोय नसल्याने रुग्णांना बाहेरील रुग्णालयात पाठविण्यात येत होते. कित्येक वर्षाने जिल्हा रुग्णालयाला 3 कोटी 41 लाख रुपयांचे सिटीस्कॅन मशिन सेवेत दाखल होणार आहे.

देर आये पण दुरुस्त आये – जिल्हा रुग्णालयातील अनेक दिवसापासून सिटीस्कॅन मशिन नाही होते. यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत असे नागरिकांच्या मागणी नुसार शिवसेनेच्या वतीने आवाज उठविला होता. सिटीस्कॅन मशिन लवकर लागले असते. तर नागरिकांचा मोठा पैसा वाचला असता मात्र उशिरा लावण्यात आले. याचे वाईट वाटते आहे.
– मंत्री गुलाबराव पाटील

अनेक रोग निदानासाठी ,व अपघातग्रस्त रुग्णांनसाठी सिटीस्कॅनची चाचणी अत्यन्त आवश्यक असते.बर्‍याच रुग्णांनमध्ये त्याच चाचनीच्या आधारावरच उपचार पद्धती ठरत असते. सामान्य रूग्णालयातील बहुतांश रुग्णांची आर्थिक स्थिती कमकुवत असते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून गैरसोयीबरोबरच आर्थिक भूदंड सर्व सामान्यांना भोगावा लागत होता.उपचार तातडीने अचुक केल्यास मदत होणार आहे.
– राधेशाम चौधरी सामाजिक कार्यकर्ते