सिटी रन विथ क्रांती; जळगाव रनर्सचा स्तुत्य उपक्रम

0

जळगाव । आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू,खान्देशकन्या क्रांती साळवी सोबत सिटी रन विथ क्रांती साळवीचे आयोजन जळगाव रनर्स ग्रुपने सोमवार 10 रोजी सकाळी 6.30 वा. केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी आरोग्यासाठी धावणे फायदेशीर आहे,असे मार्गदर्शन क्रांती साळवी यांनी केले. तसेच वॉर्म अप व स्ट्रेचिंगची नवीन पद्धतचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी रनर्सचे काही वैयक्तिक शंकेचेपण निरासरण करून मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी साडेसहाला एकसमान टी-शिर्ट्समध्ये नागरिक सागर पार्कवर एकत्र जमले होते. त्यानंतर सिटी रनला प्रारंभ झाला. सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, गणपती मंदिर, महाबळ चौक,काव्यरत्नावली चौक मार्गे सागर पार्क येथे समारोप झाला. या सिटी रनमध्ये रनर्स ग्रुप चे 80 सदस्य सहभागी झाले.