सिडकोचे मात्र या मोक्याच्या भूखंडाकडे दुर्लक्ष

0

नेरुळ | नेरुळ येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या भूखंडाचे अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झाले आहे; मात्र याकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत सिडकोच्या कित्येक भूखंडांवर अतिक्रमणे झालेली आहेत.कित्येक भूखंडांवर अनधिकृत इमारती बांधकामे झालेली आहेत.मात्र तरी सुद्धा सिडको आपल्या हक्कच्या भूकंडांकडे कानाडोळा का करते?असा प्रश्न हा भूखंड पाहिल्यावर पडतो.हा भूखंड नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला लागूनच आहे.या भूखंडाला लागूनच असलेल्या पद पथावर फेरीवाले आपले सामान सुमन घेऊन बसलेले असतात.आणि अचानक पालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी आली तर आपले सामान या भूखंडाच्या भिंतीवरून आता फेकून देतात.तसेच रात्रीच्या वेळेस कित्येक जणांनी येथे आपले सामान ठेवण्याची व्यवस्था देखील केलेली आहे.सगळ्यात मोठा कहर म्हणजे या भूखंडावर येथे बसलेले सगळे फेरीवाले आपला उरलेला कचरा देखील टाकतात. यामध्ये सडका भाजीपाला तसेच मासे विक्री करणाऱ्या कोळीणी माशांंचे अवशेष इथे टाकून देतात.तसेच इतर पिशव्या, कागद हा कचरा वेगळाच जमा होत असतो.

त्यामुळे या भूखंडाच्या आतल्या बाजूस डोकावल्यावर येथेे कचऱ्याचे ढीग साठलेले चित्र पाहायला मिळत आहे.तसेच या भूखंडावर ठीक ठिकाणी पाणी साठून हा ओला कचरा सडून त्याची दुर्गंधी पसरलेली आहे.तसेच येथे कोणतीही रोग प्रतिबंधक औषध फवारणी होत नसल्यामुळे येथील आजूबाजूच्या परीसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.तसेच या भूखंडांमध्ये रानटी झाडाझुडपांची वाढ झालेली असून;या झाडाझुडपाच्यामागे गेल्यावर गुपचूपरित्या दिसणार नाहीत अशा पद्धतीने छोट्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.यावरून येथे अतिक्रमणास सुरुवात झालेली असल्याचेे दिसत आहे.तसेच या भूखंडाचा वापर येथील फेरीवाले लघुशंकेसाठी तसेच शौचासाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.सिडकोच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी काही वर्षांपूर्वी चायनिज सेंटर उभारण्यात आले होते;मात्र ते तोडण्यात आल्यानंतर या भूखंडावर आतल्या बाजूस झोपड्या उभारण्यात आल्या आहेत.सिडकोने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.नाहीतर या मोक्याच्या भूखंडावर याही पेक्षा अधिक अतिक्रमण होण्याची शक्यता आहे.

आम्ही येथे दररोज भाजी घेण्यासाठी येतो. या ठिकाणी येथील भाजीविक्रेते सर्रास या बाजूखंडावर कचरा फेकतात, तसेच पालिकेची गाडी आली की आपले समान याच कचऱ्यात वाचवण्यासाठी फेकतात. व पुन्हा याच समानातून भाजीपाला विकतात.हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पालकेने यासाठी ठोस उपाययोजना करून या विक्रेत्यांना भाजी मार्केट बांधून देण्याची गरज आहे. जवनवकरून याठिकाणी स्वछता राहील