नवी मुंबई : घणसोली तळवली येथील सर्वेक्षण क्रमांक 186 आणि 187 मधील विकासक मोतीराम पाटील यांनी अनधिकृतपणे 368 चौ.मी क्षेत्रफळावर बांधलेल्या जी+4 आरसीसी बांधकामांवर एअर ब्रेकरच्या सहाय्याने अंशत: कारवाई करण्यात आली. ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली. ही मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी. बी. राजपूत कार्यकारी अभियंता आर .एम. कुसाळकर सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक (2) सुनिल चिडचाले, सहाय्यक विशेष नियुक्त अधिकारी व्ही. व्ही. जोशी. यांच्या पथकाने व नवी मुंबई महानगरपालिकाच्या अधिकार्यांनी कारवाई सुलभरित्या पार पाडली.
रबाळे पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सोनावणे व पोलिस निरिक्षक धुरी व 65 पोलिस कर्मचार्यांच्या यांच्या सहकार्यामुळे अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे पोलिस कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा अधिकारी व एमएसएफचे सुरवसे व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कारवाईसाठी 1 पोक्लेन, 1जेसीबी, 1 गॅस कटर , 1ट्रक , 1 टोव्हिंग व्हॅन., 6 जीप व 20 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती.