मुंबई । मुंबई जिल्हा कॅरम संघटना व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने वेल्फेअर हॉल, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अध्यक्षीय चषक कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटातील उपांत्य सामन्यात बँक ऑफ इंडियाच्या सिद्धांत वाडवलकरने बोरीचा स्पोर्ट्स क्लबच्या विवेक परमारला 25-0,25,4 असे सहज पराभूत केले.
तर विजय कॅरम क्लबच्या अमित मोहितेने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दर्शन गायकवाडवर 19-5,22-4 असा विजय मिळविला. 18 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटातील उपान्त्य सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भूमिका नेटकेने डी के सी सी च्या सुजल लोखंडेला 18-2,8-25 व 17-3 असे अटीतटीच्या लढतीमध्ये पराभूत केले. तर अमूल्या राजुलाने ( शिवतारा कॅरम क्लब ) निकिता केदारेला ( पी एम बाथ ) 25-9,25-4 असे नमविले.