सिद्धार्थ ऐवजी चक्क भटक्या कुत्र्यानेच केला रॅम्पवॉक!

0

मुंबई : बॉलीवूडचा हँडसम हंक सिद्धार्थ मल्होत्राचा काही दिवसांपूर्वीच ३४वा वाढदिवस साजरा झाला. अलिकडेच तो ‘ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूर२०१८’ या फॅशन शोमध्ये दिसला होता. यात त्याने प्रसिद्ध डिझायनर रोहित बल याने डिझाईन केलेली शेरवानी घालून रॅम्पवॉक केला.

या फॅशन शोमध्ये सिद्धार्थएवजी चर्चा झाली ती म्हणजे एका कुत्र्याची. सिद्धार्थच्या रॅम्पवॉकपूर्वीच एका कुत्र्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डिझायनर रोहित बल याने डिझाईन केलेली शेरवानी घालून सिद्धार्थ रॅम्पवर उतरणार, तेवढ्यात एक कुत्रा स्टेजवर भटकताना दिसला. यामुळे सिद्धार्थच्या टीमसोबतच उपस्थितांचीही तारांबळ उडाली.