वेडीमाता ज्येष्ठ नागरिक संघ व सिद्धिविनायक ग्रुपतर्फे डीवायएसपी गजानन राठोड यांचा सत्कार

0

जळगाव: भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी डीवायएसपी म्हणून निवड झाल्यानंतर गडचिरोली सारख्या नक्षली भागात सेवा बजावल्याने, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘पोलीस महासंचालक’ पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिद्धीविनायक ग्रुप, वेडीमाता मित्र मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला. सिद्धिविनायक ग्रुपचे यतीन ढाके, तेजस ढाके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.एन.ढाके, सीताराम भंगाळे, भागवत सपकाळे, मेघेशाम फालक, शिवाजी वाढे, आर.एन.खर्चे आदींनी गजानन राठोड यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक वसंत पाटील, पोलिस निरीक्षक दिपक गंंधाले, दिनेश भंगाळे, सागर बागुल, सौरभ बेंडाळे, प्रमोद वाघूळदे, रिंकू ढाके, शुभम महाजन, शुभम माने, मनिष नेमाडे, विलास किरंगे, अमोल झांबरे, योगेश झांबरे, राहुल पाटील, रुपेश चौधरी, मुकेश कोळी आदी उपस्थित होते.