सातव्या दिवशी हर्षोल्लासात दिला भावपूर्ण निरोप
पिंपरी-चिंचवड : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’ असा जयघोष आणि फुलांची मुक्त उधळण करत सिद्धिविनायक परिवाराने गुरुवारी दुपारी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. विशेष म्हणजे, पर्यावरणासाठी घातक असणार्या गुलाल, फटाके, डॉल्बी साऊंड सिस्टीम्स, या बाबी टाळून सिद्धिविनायक परिवाराने पारंपरिक पद्धतीने गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सातही दिवस पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या बाबी कटाक्षाने पाळण्यात आल्या. हेच सिद्धिविनायक परिवाराच्या यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये ठरले.
विसर्जन मिरवणुकीत यांचा सहभाग
विसर्जन मिरवणुकीत सिद्धिविनायक समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके, सिद्धिविनायक समूहाचे उपाध्यक्ष सुनील झांबरे, ‘जनशक्ति’चे व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी, सरव्यवस्थापक हनुमंत बनकर, वितरण व्यवस्थापक सुनील महापुरे, दत्तात्रय ढाके, अरूण चौधरी, शेखर चौधरी, अॅड. पंकज चौधरी, राम भोंडवे, मुकेश कोल्हे, सुमन ढाके, कांचन ढाके, आशालता चौधरी, पूजा झांबरे, सपना चौधरी, महिमा ढाके, क्रिश ढाके, कल्याणी झांबरे, अनुज चौधरी, समीक्षा गायकवाड, श्वेता रेंभोटकर, तुषार भामरे, सौरभ पुराणिक, चेतन पाटील, नीलेश भोळे, देवीदास कसबे, कानीफनाथ खवळे, नीलेश सायंकर आदींची उपस्थिती होती.
शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सिद्धिविनायक परिवारातर्फे दरवर्षी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदाही सिद्धिविनायक समूहाच्या मुख्य कार्यालयात शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी जय गणेश व्हिजन येथील मुख्य कार्यालयातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर ‘कृष्ण’ या निवासस्थानी विधीवत पूजा-अर्चा केल्यानंतर पाणी भरलेल्या टबमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचा हेतू
शाडू मातीची गणेशमूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी बागेतील रोपांना देण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन राखले जावे, हा त्या मागचा हेतू आहे. सिद्धिविनायक समूहाने यंदाच्या गणेशोत्सवात राबविलेल्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.