सिद्धी मोरेचा गोल निर्णायक

0

ठाणे । मिडफिल्डर सिद्धी मोरेने केेलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर फादर अ‍ॅग्नेल मल्टीपर्पज स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संघाने रायन इंटरनॅशनल स्कुलचा 1-0 असा पराभव करत नवी मुंबई विभागीय 17 वर्षाखालील मुलींच्या सुब्रतो चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. या विजयामुळे फादर अ‍ॅग्नेल संघाने मुंबई विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्‍चित केले आहे. या सामन्यात गोल करण्यासाठी दोन्ही संघानी आक्रमक चाली रचल्या. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.

सामना शूटआऊट पर्यंत लांबणार असे वाटत होते. पण सामना संपायला अवघ्या दोन मिनीटांचा अवधी असताना सिद्धीने वेगाने मुंसडी मारत संघासाठी आवश्यक असलेला गोल नोंदवला. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फादर अ‍ॅग्नेल स्कूलने ख्रिस्ट अकादमीचा 1-0 असा पराभव केला होता.