मुंबई – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला गेले होते माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांची गळाभेटही घेतली.
त्यानंतर आता सिद्धूवर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धूच्या विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि दर्गा कमिटी अजमेरचे सदस्य मोहम्मद फारुख आजम यांनी सिद्धूला खडे बोल सुनावले आहेत.