जळगाव। शहरातील औद्यागिक वसाहत परिसरातील सिध्दार्थ कार्बोकेम कंपनीत पाना पडल्याने इलेक्ट्रीक वायमरध्ये स्पार्किंग होवून स्पोट झाल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. या स्फोटात एक कर्मचारी दहा टक्के भाजला असून त्याला उपचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
औद्यागिक वसाहत परिसरात सिध्दार्थ कार्बोकेम ही कंपनी आहे. सायंकाळी प्रविण राजेंद्र तायडे (वय-31 रा. प्रजापतनगर) हा कंपनीत केबल काढायचे काम करीत होता. त्यावेळी प्रविण याच्या हातातून पाना निसटून वरती उढाला आणि इलेक्ट्रीक वायरला स्पर्श झाला. यामुळे वायरींगमध्ये स्पार्किंग होवून स्फोट झाल्याने त्या प्रविण याचा चेहरा व हात भाजला गेला. कंपनीतील कर्मचार्यांना घटना कळताच त्यांनी प्रविण याला लागलीच रिंगरोडवरील खाजगी रूग्णालयात दाखल केले. स्फोटात प्रविण हा दहा टक्के भाजला आहे. यावेळी रूग्णालयात कंपनीतील कर्मचार्यांसह मॅनेजर किशोर मोकाशी हे उपस्थित होते.