सिध्दार्थ नगरातून साडेचार हजारांची दारु जप्त

0

जळगाव। पिंप्राळा हुडको परिसरातील सिंध्दार्थ नगरात विना परवाना देशी, विदेशी दारू विक्री सुरू असलेल्या अ÷ड्ड्यावर रामानंदनगर पोलिसांनी छापा मारीत साडेचार हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. तर महिलेसही ताब्यात घेतले आहे.

स्थानिग गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना पिंप्राळा हुडको परिसरातील सिध्दार्थ नगरात विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोनि. चंदेल यांनी विलास बाबुराव पाटील, संजय सपकाळे, विनोद पाटील, रविंद्र पाटील, वैशाली पाटील आदींचे पथक तयार करून कारवाईसाठी पाठविले. सिध्दार्थ नगरात अनुसयाबाई जगन जंजाळे ही महिला विनापरवाना देशी, विदेशी दारू मोकळ्या जागेत विक्री करत असतांना दिसून आल्यानंतर पथकाने सापळा रचत त्या अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पथकाने यावेळी महिलेस ताब्यात घेत 4 हजार 449 रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली.