सिध्दिविनायक समुहातर्फे शनिवारपासून माय जॉब फेअर !

0

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग; जळगावात केसीई इंजिनिअरिंगमध्ये आयेाजन

जळगाव- सिद्धिविनायक समुहाचे संस्थापक चेअरमन  कुंदन ढाके, केसीई इंजिनिअरिंग कॉलेज आणि आयएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने 15 व 16 डिसेंबर रोजी ‘माय जॉब फेअर 2018’ या महारोजगार मेळाव्याचे केसीई इंजिनिअरिंग कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवरील 40 नामाकिंत कंपन्या सहभागी होणार असल्याने तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सिद्धिविनायक समुहाचे संस्थापक चेअरमन कुंदन ढाके, आयएमआरच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांनी मोठ्या शहरात जावून नोकरीचा शोध घेण्याऐवजी मोठ्या कंपन्यांनाच जळगाव शहरात आणण्याचा अभिनव प्रयोग सिद्धिविनायक समुहातर्फे जिल्ह्यात प्रथमच करण्यात येेत आहे. यासाठी माय जॉब फेअर आयोजित करण्यात आले आहे. या जॉब फेअरचे उद्घाटन शनिवार 15 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत केसिई अभियांत्रिकी महाविद्यायात होणार आहे. या जॉब फेअरमध्ये टाटा, टेक महिंद्रा, एमआरएफ, विप्रो, परसिस्टंट, फोर्स मोटर्स, बजाज, सुझलॉन, फिनोलेक्स यासह विविध कंपन्यांचा एचआर अधिकारी मुलाखती घेण्यासाठी येत आहेत. यात आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तरसह अनुभवी उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची निवड करण्यात येणार आहे.

नोंदणी कशी कराल व नंतर काय?
इच्छुकांना जॉबफेअरमध्ये सहभागी होण्यााठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. नोंदणीसाठी www.myjobfair.in या वेबसाईटवर जाऊन किंवा My Job Fair  हे मोबाईल अ‍ॅप इंस्टॉल करून यावरूनही नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जळगावातील केसीई अभियांत्रिक महाविद्याल उपस्थित राहायचे आहे. महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच अधिकारी उपस्थित असतील. नोंदणीनंतर उमेदवारांच्या मोबाईलवर आलेला क्युआरकोड या अधिकार्‍यांना दाखवायचा आहे. हा क्युआरकोड स्कॅन झाल्यानंतर तुमचा वर्ग क्रमांक व तुमच्या मुलाखती संदर्भातील सर्व माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार तुम्ही त्या वर्गात जाऊन तुम्हाला मुलाखत देता येणार आहे. मुलाखत आटोपल्यानंतर सायंकाळपर्यंत तुमच्या निवडीसंदर्भात तुम्हाला कळविण्यात येणार आहे.

नोंदणी न केल्यास काय?
ज्या इच्छुकांनी नोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांसाठी नोंदणीसाठी आयएमआर कॉलेजला नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. आएमआर कॉलेजच्या प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच उजव्या बाजुला वळून थोड आतमध्ये चालत गेल्यावर कॉम्प्युटर सेंटर आहे. या कॉम्प्युटर सेंटरमध्ये तुम्हाला नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर मिळालेला क्युआर कोड केसीईत उपस्थित अधिकार्‍यांना दाखवून तुम्हाला मुलाखतीला बसता येणार आहे. आवश्यक त्या सूचना, त्या त्यावेळी देण्यात येतील.